Pune Vande Bharat : पुण्याहून सातारा मार्गे हुबळीपर्यंत धावतेय वंदे भारत, तिकिट किती?

Pune-Hubballi Vande Bharat Express Route, Stations, Timings & Fare : सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसची संख्या भारतीय रेल्वेकडून वाढवली जात आहे. पुण्याहूनही वंदे भारत एक्सप्रेस धावतेय. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडण्यासाठी भारतीय रेल्वेकडून पुणे-हुबळी ही वंदे भारत एक्सप्रेस गेल्यावर्षी सुरू करण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांना जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव प्रदान देते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे-हुबळी या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०२४ रोजी केले. या एक्सप्रेसला 8-कोच आहेत. पुणे ते हुबळी दरम्यान सातारा, कोल्हापूर, बेळगाव आदी थांब्यांसह धावते. 160 किमी/तास कमाल वेग, वातानुकूलित डबे, सीसीटीव्ही, वायरलेस चार्जिंग आणि स्वच्छतेच्या सुविधा या ट्रेनमध्ये आहेत.

पुणे ते हुबळी वंदे भारत कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? Hubballi–Pune Vande Bharat Express, List of Stations:

पुणे ते हुबळी मार्गावर सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर, बेळगाव आणि धारवाड येथे थांबे आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवासाचा कालावधी कमी करून प्रवाशांना वेगवान सेवा मिळते.

तिकीट दर (विना केटरिंग):

चेअर कार: ₹1,150

एक्झिक्युटिव्ह क्लास: ₹2,360

वेळापत्रक काय ?

पुणे रेल्वे स्थानकावरून हुबळीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 4:15 वाजता सुटते. ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवस रविवार, बुधवार आणि शुक्रवारी धावते. पुणे-हुबळी यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस प्रतितास १६० किमीच्या वेगाने धावते. पुण्याहून सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जाण्यासाठी हा चागला पर्याय आहे. पुणे ते हुबळी हे अंतर वंदे भारत ८ तास ३० मिनिटात पार करते. कोल्हापूरला पुण्याहून जाण्यासाठी ३ ते ४ तास अंतर लागते. हे वेळापत्रक आणि थांबे आणि अंतर बदलू शकतात. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला www.irctc.co.in/www.irctc.co.in भेट द्या

चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असे आठ कोच वंदे भारत बंगळुरू ट्रेनला आहेत. भविष्यात बोगीची संख्या वाढवण्यात येईल, असे संकेत मिळाले आहे. वंदे भारतमुळे आरामदायी प्रवास करता येतोय. वातानुकूलन, सीसीटीव्ही, वायरलेस चार्जिंग, स्वच्छ शौचालये यासारख्या सुविधा वंदे भारतमध्ये मिळतात.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply