Pune : पुणे विद्यापीठ परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा; सूर्यास्तानंतर सतर्क राहा, विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना आवाहन

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या संदर्भातील अफवांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने वन विभागाशी संपर्क साधून योग्य त्या उपाययोजना करण्याच्यादृष्टीने पावले उचलली असून विद्यापीठाच्या आवारात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याची अफवा पसरली होती. त्यावर वन विभागाशी संपर्क साधून या माहितीची पडताळणी करण्यात आली आहे.

त्यानंतर सोशल मिडियावर फिरत असलेला बिबट्याच्या वावराची ध्वनिचित्रफीत ही औंधमधील सिंध सोसायटीमधील असल्याची माहिती समोर आली. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ परिसरात बिबट्याचा वावर दिसल्यास त्वरित वनविभाग आणि विद्यापीठाचा सुरक्षा विभाग यांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. वन विभागाशी संपर्क साधण्यासाठी '१९२६' आणि विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाशी संपर्क साधण्याकरिता '०२०-४८५५३३८३' किंवा '०२०-२५६२१०००' या क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाने सांगितले आहे.

Pune : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला १० दिवसांची मुदतवाढ; ४ डिसेंबर रोजी होणार महत्त्वाची सुनावणी

वन विभागाकडून बिबट्याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यास त्याबाबत त्वरित माहिती देण्यात येईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. बिबट्याच्या वावरासंदर्भात ध्वनिचित्रफीत, छायाचित्र अधिकृत माहिती प्राप्त झाल्याशिवाय अथवा सत्यता पडताळणी केल्याशिवाय सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट करू नये. याबाबत भीतीदायक वातावरण निर्माण होईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन वन विभागाने केले असून त्याचे पालक करावे, असे विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे संचालक सुरेश भोसले यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *