Pune University : पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्ये विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ; भाजी-चपाती आंबट लागल्याचा आरोप

Pune University : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील  सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न खायला दिल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये दुपारच्या जेवणामध्ये देण्यात आलेली भाजी आणि चपाती आंबट लागत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. संतप्त विद्यार्थ्यांनी कॅन्टिनमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील कॅन्टिनमध्ये सोमवारी विद्यार्थी जेवण करीत होते. यावेळी चपाती आणि भाजीची चव आंबट लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडून ताट तसेच ठेवून निघून गेले. काही विद्यार्थ्यांनी तत्काळ कॅन्टिनधील कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. विद्यार्थ्यांनी मेस कर्मचाऱ्यांना जाब विचारला तर त्यांच्यामध्ये वाद झाला. निकृष्ट दर्जाचे जेवण खायला देत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कॅन्टिनमध्ये गोंधळ घातला. याप्रकरणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवले आहे.
 
 
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने या पत्रामध्ये असे लिहिले की, २२ एप्रिलला विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले गेले. चौकशीअंती निष्पन्न झाले की, चपात्याचे पीठ खराब झाले होते. त्यामुळे सर्व चपात्या आंबट लागत होत्या. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी मेस चालक आणि मेस कर्मचाऱ्यांना निकृ्ष्ट जेवणासंदर्भात विचारणा केली आणि असे निकृष्ट जेवण विद्यार्थ्यांना देऊ नका विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ शकते, अशी विनंती केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी एका विद्यार्थ्यास तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. मी लोकलचा आहे अशापद्धतीची भाषा त्याने विद्यार्थ्यांच्या प्रती वापरली.
 
तसंच, कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची काळजी घ्यायची, विद्यार्थ्यांना उत्तम आणि पौष्टिक अन्न देण्याऐवजी उलट कर्मचारी विद्यार्थ्यांना पाहून घेण्याची धमकी देत असतील तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे. त्यामुळे संबंधित मेस चालक आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसंच, अशापद्धतीने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम कोणी करत असेल आणि त्यांना धमकी देण्याचे काम कोणी करत असेल तर आम्ही त्याचे उत्तर तीव्र आंदोलनाच्या स्वरुपामध्ये देऊ, असा इशारा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने दिला आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply