Pune University : तब्बल ८० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती

पुणे : तब्बल ८० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शनिवारी याबाबत निर्णय घेण्यात आला असून, कुलसचिवांनी यासंबंधीचे परिपत्रक जाहीर केले आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाल्यानंतर आता प्र-कुलगुरू म्हणून कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्कंठा निर्माण झाली होती. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार पूर्वी विद्यापीठाचे कुलपती अर्थात राज्यपालांच्या कडून प्र -कुलगुरूंची निवड केली जात होती.

परंतु, विद्यापीठ कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र-कुलगुरूंची निवड करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार शनिवारी डॉ. पराग काळकर यांची प्र - कुलगुरू पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Beed Accident: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; मामासह ८ महिन्यांच्या भाचीचा जागीच मृत्यू

डॉ. पराग काळकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत आहेत. काळकर हे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या शर्यतीत होते. पहिल्या पाच उमेदवारांमध्ये ते आले होते.

आता त्यांना प्र-कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने यापुढील काळात त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. विद्यापीठाचे घसरलेले रँकिंग, उशिरा लागणारे निकाल अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.

विद्यापीठातील विविध विभाग व संलग्न महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राबवाव्यात लागणाऱ्या उपाय योजनांचे नियोजन त्यांना करावे लागणार आहे. दुसरीकडे डॉ. काळकर यांच्या निवडीला काही विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply