Pune Train : पुणेकरांना रेल्वेचे खास गिफ्ट, आजपासून धावणार नवीन एक्सप्रेस

Indian Railways launches a new Hadapsar–Jodhpur Express from Pune : भारतीय रेल्वेकडून पुणेकरांना खास गिफ्ट देण्यात आलेय. आजपासून पुण्याच्या हडपसर रेल्वे स्थानकातून नवीन एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नव्या ट्रेनचा शुभारंभ होणार आहे. पुण्यातून आजपासून जोधपूरला नवीन एक्सप्रेस धावणार आहे. त्याशिवाय रेल्वेमंत्री एमजीआर चेन्नई सेंट्रल-भगत, कोठी एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवतील.

एक्स्पप्रेसची वेळ काय असणार ?

विशेष ट्रेन क्रमांक ०१४०१ हडपसर (पुणे) – जोधपूर एक्सप्रेस पुणे येथून दि. ३ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि जोधपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता पोहोचेल, तर गाडी क्रमांक ०१४०२ जोधपूर – पुणे एक्सप्रेस (एकेरी विशेष) जोधपूर येथून दि. ४ मे रोजी रात्री साडेआठ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचेल.

नवीन एक्सप्रेस कोण कोणत्या स्थानकावर थांबणार?

या गाडीला चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा जंक्शन, अहमदाबाद, महेसाना, पालनपूर, आबू रोड, पिण्डवाड़ा, जवाई बॉंध, फालना, राणी, मारवाड़ जंक्शन, पाली मारवाड आणि लुनी येथे थांबे आहेत.

नव्या एक्सप्रेसला किती कोच असणार ?

एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, ०५ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनररेटर व्हॅन. दरम्यान, विशेष गाड्यांच्या तपशीलवार थांब्या आणि वेळेसाठी कृपया www.enquiryindianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply