Pune Traffic Report : पुण्यातली वाहतूक कोंडी जगात भारी, टॉप ५ मध्ये कोणती शहरे?

Pune Traffic Report : पुणे तिथे काय उणे....हे ब्रिदवाक्य अगदी अभिमानाने पुणेकर मिरवत असतात...प्रत्येक गोष्टीत आम्हीच अग्रेसर असं म्हणणारे पुणेकर आता वाहतूक कोंडीतही मागे राहीले नाहीयेत... जगात अनेक मोठ्या शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरतेय...शहरात वाहनांची संख्या वाढल्याने कमी अंतर कापण्यासाठीही बराच वेळ लागतोय...‘टॉम-टॉम’ या डॅनिश संस्थेने जगभरातल्या वाहतूक कोंडीचे सर्वेक्षण करून अहवाल प्रसिद्ध केलाय.

संबंधित शहरामध्ये १० किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणार वेळ याचे सर्वेक्षण केलं आहे. आणि या जागतिक वाहतूक कोंडी अहवालात पुणे चौथ्या क्रमांकावर आहे...पुण्यात 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 33 मिनिटं 22 सेकंद इतका वेळ लागतोय...मुख्य म्हणजे पहिल्या पाचमधील तीन स्थानांवर भारतातील शहरं आहेत....

पुण्यातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी जगात भारी !

शहर - 10 कि मी.साठी लागणारा वेळ

1. बरानकिला (कोलंबिया) - 36 मि. 6 सेकंद

2. कोलकाता - 34 मि. 33 सेकंद

3. बेंगळुरू - 34 मि. 10 सेकंद

4. पुणे - 33 मि. 22 सेकंद

5. लंडन - 33 मि. 17 सेकंद

यावर वाहतूकतज्ज्ञांचं काय मत आहे ते पाहूयात....

Pune-Ernakulam Express : सांगली, मिरजकरांचा प्रवास खडतर, पुणे - एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस २ महिन्यांसाठी रद्द

एका बाजूला पुणे शहराचा विकास आणि विस्तार चहू बाजूंनी होतोय...तर त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामं आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा वाहतुकीला फटका बसतोय. नेमकी काय कारणं आहेत ते पाहूताय....

पुण्यात यामुळे होते वाहतूक कोंडी

मेट्रोचे विस्तारीकरण

उड्डाणपुलांची कामं

रस्त्यावर पडलेले खड्डे

वाहनांची वाढलेली संख्या

असक्षम वाहतूक व्यवस्था

अरुंद रस्ते

फुटपाथची दुरवस्था

अनधिकृत फेरीवाले

यामुळे वाहतूक कोंडीचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे राज्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनीही आपापल्या पद्धतीने ही वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. नाहीतर आता चौथ्या क्रमांकावर असलेले पुणे वाहतूक कोंडीतही अव्वल व्हायला वेळ लागणार नाही.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply