Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! १० नोव्हेंबरपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातील वाहतूक मार्गत मोठे बदल करण्यात आले आहेत. स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग आज रात्री ११ वाजल्यापासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या भुयारी मार्गाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्गाच्या दुरुस्तीची कामे १० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार असून तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.केशवराव जेधे चौकातील भुयारी मार्गाच्या कडेच्या भिंतींमधून पाणी गळत असून भुयारी मार्गामध्ये पाणी साचते. त्यामुळे या मार्गावरून वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Pune : फेसबुकवर ‘इन्स्पेक्टर चुलबुल पांडे’ बनून महिलांना फसवणारा बनावट पोलीस अखेर जेरबंद

पुढील तीन दिवसांत भुयारी मार्गात हे दुरुस्तीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शंकरशेठ रस्त्यावरून येणाऱ्या वाहनचालकांनी भुयारी मार्गाने न जाता डावीकडील रस्त्याने जेधे चौकात येऊन तेथून सारसबागेकडे वळावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे. या काळामध्ये वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणेकरांना करण्यात आले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *