Pune Traffic News : पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic News : पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरातील सिमला ऑफिस चौकाजवळ गर्डर लॉचिंग टाकण्याचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे येत्या ४ मेपासून शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही रस्ते बंद करण्यात आले आहे. पर्यायी मार्गाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून पुणे शहर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीपासून नेमकी कधी सुटका होणार? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत. अशातच येत्या ४ मेपासून शहरातील वाहतुकीत पुन्हा बदल करण्यात येणार आहे.

Lok Sabha Election Votting : वासुदेव आला रे, वासुदेव आला...; पिंपरी चिंचवडमध्ये वासुदेव करतायत मतदानासाठी जनजागृती

पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

  • वीर चाफेकर चौक ते न.ता.वाडी के.बी. जोशीमार्ग चौक ते सिमला ऑफिसचौक (एस.टी. स्टैंड मार्ग) हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात येणार आहे.

  • वीर चाफेकर उड्डानपुलावरुन सिमला ऑफिस चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्रवेश बंद राहणार आहे.

  • फर्ग्युसन कॉलेज रोडवरुन वीर चाफेकर चौकातून सिमला ऑफिस चौकामध्ये जाण्यासाठीचा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.

  • याशिवाय न.ता.वाडी चौक ते चाफेकर चौक प्रवेश देखील बंद राहणार आहे.

  • स. गो. बर्ने चौकाकडुन सिमला ऑफिस चौकामधुन शिवाजीनगर रेल्वेस्टेशनकडे प्रवेश बंद राहणार आहे.

  • शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून एस.टी. स्टैंड सर्कल वरून न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहणार आहे.

  • सिमला चौकाकडुन पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एल. आय. सी. कडील बाजूने चाफेकर उड्डाण पुलाचा वापर करावा.

  • वीर वाफेकर चौक ते न.ता.वाडी चौक ते सिमला ऑफिस रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्कीग असेल.

  •  


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply