Pune Traffic News : पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; जड वाहनांना नो एन्ट्री, वाचा पर्यायी मार्ग कोणते

Pune  : पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. नागरिकांची होत असलेली गौरसोय लक्षात घेता आता पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये उद्यापासून (5 मार्च) जड वाहनांना नो एन्ट्री आहे.

पिंपरी चिंचवड, मुंबई ,सातारा ,सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी असणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेत वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Pune Railway News : पुणे रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका; महिनाभरात तब्बल 'इतक्या' कोटींचा दंड वसूल

या मुख्य मार्गांवर जड वाहने बंद

पुण्यातून बाहेर असल्यास देखील आता कोणत्याही जड वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाहीये. पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उद्यापासून एकाही जड वाहनाला या मार्गांवर प्रवेश दिला जाणार नाही.

पर्यायी मार्ग कोणते?

जड वाहनांना वाघोली ते पुणे शहराच्या दिशेनं 24 तास प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गांऐवजी शिक्रापूरहून चाकण मार्गे पिंपरी चिंचवड आणि तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे तसेच अहमदनगरकडे जड वाहनांना जाता येणार आहे.

सोलापूरला जाण्यासाठी थेऊर फाटा इथून पुढे लोणीकंद आणि शिक्रापूर मार्गे पर्यायी मार्ग आहे. पुणे सासवड असा प्रवास करणाऱ्या जड वाहनांसाठी हडपसर मार्गे थेऊर फाटा येथून पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. येथून लोणीकंद आणि शिक्रापूर मार्गाने देखील जड वाहनांना प्रवास करता येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply