Pune Traffic : पुणेकर अडकले वाहतूक कोंडीत; देशात सातव्या क्रमांकावर

Pune Traffic : पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आता नवीन राहिलेली नाही. पुणेकर वाहतूक कोंडीमुळे वैतागलेले आहे. देशामध्ये वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा सातवा क्रमांक लागतो. त्यामुळे आता राज्य सरकारने याबद्दल अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारच्या सूचनेनंतर पुणे शहरातील वाहतूककोंडीचा अभ्यास मुंबई आयआयटी करणार आहे. वाहतुकीचा वेग सर्वाधिक संथ असणाऱ्या शहरांच्या यादीत देखील पुण्याचा २०वा क्रमांक असल्याचं आढळून आलं आहे.

Follow us -

गेल्या काही महिन्यांपासून पुणेकर वाहतूककोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत पुणेकरांना शहराच्या अनेक भागात वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी आणि त्यावर अभ्यास करण्याचे आदेश राज्य सरकारने आयआयटी मुंबईला दिले आहेत

वाहतूक कोंडीबाबत मंत्रालयामधील अधिकारी, आयआयटीचे प्रतिनिधी आणि पुणे महापालिका आयुक्त यांच्यात काल एक बैठक पार पडली. गेल्या ५-६ वर्षात पुणे शहरातील वाहतुकीत काय बदल करण्यात आले. याचा विचार करून वाहतूककोंडीच्या समस्येचा अभ्यास करावा. तसेच याबाबत अहवाल तयार करावा अशी सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply