Pune : कात्रज बोगदा ते वारजेपर्यंत भीषण वाहतूक कोंडी! पुणेकर दीड तासांपासून अडकले

Pune : दिवाळीसाठी गावी गेलेले पुणेकर आज (रविवार) परत पुण्याकडे येत असल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगदा ते वारजे उड्डाणपूलापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तब्बल दीड तासांपासून अनेक वाहनं रस्त्यावरच अडकलेली असून वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यातच आज सायंकाळी पडलेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्थापनात आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे रस्ते ओले झाल्याने वाहनांची गती मंदावली असून वाहतूक पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे.

Ahilyanagar : समृद्धी महामार्गावर भराव ढासळला; महाराष्ट्राच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'च्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, सुरक्षिततेवर मोठा सवाल

उद्या (सोमवार) पासून बहुतांश नागरिकांचे नियमित कामकाज सुरू होत असल्याने आणि शाळाही पुन्हा सुरू होणार असल्यामुळे, दिवाळी सुट्टीवर गेलेले पुणेकर आज कोणत्याही परिस्थितीत शहरात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

फक्त पुणे-बंगळुरू महामार्गाच नव्हे, तर पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढलेली दिसत आहे. मराठवाड्यातील विविध शहरांमधून विद्यार्थी आणि नोकरदार पुण्याकडे परतत असल्याने अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *