Pune Traffic : मुंबई बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प; नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

Pune Traffic : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचा मोठा फटका पुण्यालाही बसला आहे. मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प झालेली आहे.

नदी पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.मुंबई बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. वारजे भागातील रस्ता मुंबई बंगळुरू महामार्गाला जाऊन मिळतो. या भागातील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक, नागरिक, विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. वडगाव, धायरी, नऱ्हे,आंबेगाव परिसरातील सर्व सेवा रस्ते वाहतूककोंडीमुळे ठप्प झाले आहेत. वारजे, सिंहगड, भारती विद्यापीठ पोलिसांच्यावतीने वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणाच्या तपासाला सुरुवात; मुंबई गुन्हे शाखेकडे जबाबदारी

मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई बंगळुरू महामार्गासह मुंबई - नाशिक महामार्गावर शहापूर ते आसनगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन मध्ये खड्ड्यामध्ये एक गाडी आदळून बंद पडली. त्यामुळे रस्ता ब्लॉक झाला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply