Toll Plaza : खेड शिवापुर टोलनाक्यावर 1 एप्रिल पासुन टोल अडीच टक्क्यांनी वाढणार

Pune : पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर एक एप्रिल पासुन सुमारे अडीच टक्क्यांनी टोल वसुली वाढणार असुन या बाबत ठेकदार टोल रोड प्रशासना मार्फत पत्रक प्रसिध्द करण्यात आले असल्याची माहीती विभागीय प्रमुख अमित भाटिया यांनी दिली आहे.

टोल रोड प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाच्या करारा नुसार दरवर्षी टोल चे दर वाढत असतात यावर्षी 1 एप्रिल 2024 पासुन सुमारे अडीच टक्के टोल वाढ होणार असल्याची माहीती टोल रोडचे विभागीय व्यवस्थापक अमित भाटीया यांनी दिली असुन प्रवाशांनी या टोल वाढीसाठी सहकार्य करण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.

Maharashatra Politics : बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, लोकसभेचे तिकीट मिळणा

या वाढणारया टोल वसुली मध्ये कार जीप व हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरात पाच रुपयांची वाढ होणार असुन मागील वर्षी घेण्यात येणार 115 रुपये दर आता 120 होणार आहे,हलक्या व्यवसाईक वाहनांच्या टोल दरातही पाच रुपयांची वाढ होत असुन या वाहनांना 185 ऐवजी 190 रुपये द्यावे लागणार आहेत,

बस ट्रक साठी दहा रुपयांची वाढ होणार असुन आता 400 रुपये दर द्यावा लागणार आहे तर जड वाहनांसाठी 415 रुपयांवरुन पाच रुपये वाढुन 420 रुपये होणार आहे या बरोबरच अवजड वाहनांसाठीच्या 615 रुपये टोल मध्ये 15 रुपयांची वाढ होणार असुन अवजड वाहनांना आता 630 रुपये टोल द्यावा लागणार आहे.

स्थानिकांच्या मासिक पास मध्ये देखिल 1 एप्रिल पासुन दहा रुपयांची वाढ होणार असुन आता मासिक पास 340 रुपये होणार आहे सर्वच स्थानिक वाहन चालकां कडुन टोल वसुली साठी वरीष्ठ व्यवस्थापन प्रयत्नशिल असुन स्थानिकांनी 340 रुपयांचा मासिक पास घेऊन सहकार्य करावे अशी आम्ही विनंती करणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक अमित भाटिया यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply