Pune : पुण्यात अटक केलेल्या दहतवाद्यांकडून धक्कादायक माहिती उघड, जंगलात केली होती बॉम्बस्फोटाची चाचणी, ATSची माहिती

Pune News: पुण्याच्या कोथरुडमधून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची एटीएसकडून (ATS) कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी जंगलामध्ये बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाने म्हणजे एटीएसने आज न्यायालयामध्ये दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूडमधून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे. एटीएसने आज न्यायालयात यासंदर्भात रिमांड रिपोर्ट देखील सादर केला. आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) कलमवाढ करण्यात आली आहे.

दोन्ही दहशतवाद्यांची पोलीस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. सत्र न्यायालयाने या दोन्ही आरोपींना ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (२४ वर्षे), मोहमम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (२३ वर्षे) अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत.

Crime News : ज्या रस्त्यावर तोडफोड, भाईगिरी करायचे त्या रस्त्यावरूनच काढली पोलिसांनी धिंड

एटीएसने अटक केलेले दोन्ही दहशतवादी हे पुणे येथील कोंढव्यातील मीठानगरमधील चेतना गार्डन येथे राहत होते. त्यांच्यासोबतचा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (३१ वर्षे) हा दहशतवादी सध्या पसार झाला असून पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, पुणे पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गाडी चोरताना दोन आरोपींना त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरांची झडती घेतली होती. त्यावेळी त्यांच्या घरातून पोलिसांनी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. कोंढव्यात दोघेही भाड्याच्या घरामध्ये राहत होते. याप्रकरणी दोघांची कसून चौकशी केली असता ते दोघे दहशतवादी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply