Pune Terrorist : ATS कडून पुरून ठेवलेले बॉम्बचे साहित्य जप्त, दोन पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे हस्तगत,

पुणे : महाराष्ट्र इसिस मॉड्यूलप्रकरणी अटक करण्यात आलेला डॉ. अदनान अली सरकार याचा निकटवर्तीय झुल्फिकार बडोदावाला याने कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या मदतीने इतर साथीदारांसाठी बॉम्ब बनविण्याचे शिबिर आयोजित केले होते.

ज्या ठिकाणी बॉम्बचे साहीत्य पूरुन ठेवले होते, त्या ठिकाणाहून केमीकल्स व केमीकल्स पावडर दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) हस्तगत केली आहे. दोन्ही दहशतवाद्यांनी वापरलेले एक चारचाकी वाहन, दोन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे देखील हस्तगत करण्यात एटीएएसला यश आले आहे.

या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात तसेच त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये मिळालेल्या माहितीद्वारे त्यांचे इसिस या दहशतवादी संघटनेशी असलेले संबंध तपासात निष्पन्न झाले आहेत. अटक आरोपींचा फरार झालेल्या साथीदाराचा, तसेच या आरोपींना फरार असताना मदत करणाऱ्यांचा दहशतवाद विरोधी पथकाकडील विविध पथके तपास करीत आहे.

Mumbai Threat Call : लोकलमध्ये साखळी स्फोटांची धमकी; पोलिसांना आला फोन, मुंबईत एकच खळबळ

एटीएसने जप्त केले हे साहित्य

विविध केमीकल्स, केमीकल पावडर, लॅब इक्युपमेन्टस, थर्मामिटर, पिपेट असे बॉम्ब बनविण्याचे साहीत्य आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे. अटक आरोपी व फरार साथीदार आरोपी यांनी पुणे व इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेली एक दुचाकी देखील एटीएसने जप्त केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply