Pune Swargate ST Depot Case : ना ओळख, ना कुठला व्यवहार, पसरत असलेले नरेटीव्ह दत्ता गाडेच्या वकिलाने काढले खोडून

Pune Swargate ST Depot Case : सोशल मीडियावर काही जणांनी स्वारगेट एसटी डेपोमधील प्रकार हा सहमतीने झाला असल्याचे सांगितलं होतं. या प्रकरणातील पीडित तरुणीने आरोपीकडून पैसे घेतले होते असे आरोप सुद्धा तिच्यावर करण्यात आले. तसेच दोघांची या आधीच ओळख होती असे देखील सांगण्यात आले. आज मात्र याबद्दल आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांकडून कुठली ही माहिती देण्यात आली नाही.

आरोपीच्या वकिलानेच नरेटीव्ह काढले खोडून

आरोपी आणि पीडित तरुणीमध्ये व्यवहार झाल्याचे आम्ही बोललो नसल्याची कबुली आरोपीचे वकील वाजीद खान यांनी आज माध्यमांना दिली. आरोपी दत्ता गाडे याचे एक वकील वाजीद खान यांनी पत्रकार परिषद घेतली. पीडित तरुणी आणि आरोपी यांचे लोकेशन, आर्थिक व्यवहार आणि एकमेकांच्या ओळखीबद्दल केलेल्या दाव्यावर वकिलांचे कुठले ही स्पष्टीकरण आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आले नाही. पीडित तरुणी आणि आरोपी यांच्या ओळखीबद्दल अधिकृत वकिलांकडून कुठली ही बाजू मांडण्यात आलेली नसल्याची माहिती आज वकिलांनी दिली. "त्या दोघांच्या मध्ये अर्थी व्यवहार झाला असे आम्ही बोललोच नाही" असा दावा सुद्धा यावेळी वाजीद खान यांनी केला.

Ulhasnagar Crime : कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी रस्त्यात गाठत केले भयानक कृत्य; उल्हासनगरातील रात्रीची घटना

पोलिस सुरक्षा द्या, आरोपीच्या वकिलांची मागणी

दरम्यान, आरोपी दत्ता गाडे याचे वकील वाजीद खान यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली. या संबंधी खान यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना संरक्षणाच्या मागणीचे पत्र सुद्धा लिहिले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना सोशल मिडियावर निगेटिव्ह कमेंट येत आहेत. प्रकरण लढण्यासाठी प्रकरणाच्या वेळीस आम्हाला पोलिस संरक्षण देण्यात यावे असे अर्जात म्हटले आहे.

...तर फाशीची शिक्षा द्या, आरोपीच्या भावाचे मत

आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आरोपीच्या वकिलांसोबत दत्ता गाडे याचा भाऊ सुद्धा उपस्थितीत होता. जे काय प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी व्हायला पाहिजे होती. ज्या महिलेसोबत ही घटना घडली तिला सुद्धा न्याय मिळाला हवा. आरोपीला फाशी दिली तरी चालेल पण घटना सत्य आहे का नाही हे तपासायला पाहिजे असे मत दत्ता गाडे याच्या भावाने व्यक्त केले.

या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी. चौकशीनंतर माध्यमांनी नाण्याची दुसरी बाजू सुद्धा दाखवावी असे दत्ता गाडेच्या भावाने म्हटले आहे. या घटनेनंतर आमच्या गावातील लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून आम्हाला हिणवले जात असल्याचे ते म्हणाले. स्वारगेट एस टी स्टँड प्रकार घडल्यानंतर दत्ता घरी आला पण तो याबद्दल काहीच बोलला नाही. प्रकार घडला याआधी दत्ता गुलटेकडी येथे तो भाजी विकत होता अशी माहिती त्याच्या भावाने माध्यमांना दिली.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply