Pune Swargate : अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई; स्वारगेट बस डेपोतील 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune : स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय मुली अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर बस स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अत्याचाराची घटना घडल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. स्वारगेट आगारातील सुरक्षा रक्षकांच्या केबिन समोर उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला. त्यानंतर बस स्टेशनमधील सुरक्षा व्यवस्थेवर टीका केली जात आहे. आता परिवहन खातं खडबडून जागं झाले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निलंबनाची कारवाई केलीय.

प्रताप सरनाईक यांनी याप्रकरणी थेट २३ सुरक्षा रक्षकांचे निलंबन केलंय. पहाटेच्या वेळी २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटनेने संपूर्ण पूणे हादरून गेले आहे. या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलीय. प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट बस डेपोतील सर्व 23 सुरक्षा रक्षकांना नोकरीवरून काढून टाकलंय. आजपासून नवे सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश देण्यात देखील आलेत.

Pune Swargate : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीवर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

तसेच डेपो मॅनेजर, वाहतूक नियंत्रक यांच्यावरही आगामी काळात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी कारवाई करण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीअंती कारवाई करण्याचा निर्णय झाला. परिवहन आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात आल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आलाय. डेपो मॅनेजर, वाहतूक नियंत्रकांची चौकशी करुन अहवाल सादर केला जाणार आहे. अहवाल सादर केल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.

इतकेच नाहीतर मंत्री सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधिक्षक) आणि आगार व्यवस्थापक यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहे. यात अधिकार दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी उद्या एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलाविण्याचे निर्देश देखील मंत्री सरनाईक यांनी दिलेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply