Pune Swargate: नराधम दत्ता गाडेचं भयानक कृत्य, 'त्या' रात्री आणखी एका महिलेची काढली होती छेड

Pune Swargate : स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये झालेल्या २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार प्रकरणी अनेक धागे दोरे सापडत आहे. अनेक बाबी समोर येत आहेत. या घटनेनंतर राज्यात संतपाची लाट उसळी. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अशातच दत्ता गाडे संदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे. त्याच रात्री दत्ता गाडेनं आणखी एका महिलेची छेड काढली होती. नंतर पहाटे शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला असल्याचं समोर आलं आहे.

आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी तब्बल ७५ तासांनी ताब्यात घेतलं. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टातही वकीलांकडून युक्तीवाद सुरू आहे. दत्ता गाडेचा वकील अनेक दावे करत आहेत. हळूहळू या प्रकरणासंदर्भात धागे दोरे सापडत आहेत. अशातच आणखी एक माहिती समोर आली आहे. स्वारगेट बस डेपोत शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराची घटना घडलेल्या त्याच रात्री दत्ता गाडेनं एका अज्ञात महिलेची छेड काढली होती. त्या रात्री महिलेची छेड काढल्यानंतर, पहाटे गाडेनं २६ वर्षीय तरूणीवर अतिप्रसंग केला होता.

Mumbai Traffic : मुंबईत मोठी वाहतूक कोंडी, पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या ४ किमी पर्यंत रांगा

मात्र, तरूणीवर अतिप्रसंग करण्यापूर्वी ओळखीतल्या महिलेला गाडेनं फोन केला होता. त्यानं त्या महिलेला सहा फोन केले असल्याची माहिती समोर आली आहे. 'पोलिस भरती करून देतो' असं म्हणत त्यानं ओळखीच्या महिलेला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पहाटे ती महिला आली नाही. महिला न आल्यामुळे फलटणला जाणाऱ्या तरूणीसोबत त्यानं ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. फलटणला जाणारी महिला स्वारगेट बस डेपोत बसची वाट बघत होती. दत्ता गाडेच्या डोक्यात तरूणीसोबत कुकृत्य करण्याचा विचार आला आणि तिला आपल्या जाळ्यात ओढलं आणि लैंगिक अत्याचार केला.

स्वारगेट बस स्थानकात आता महिला सुरक्षा रक्षक

स्वारगेट एसटी बसस्थानकावर पहिल्यांदाच महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासह तक्रार निवारण कक्ष देखील स्थापन केला जाणार आहे. स्थानकाचे सुरक्षा लेखापरीक्षण झाल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक यांनी दिली आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply