Pune : विमान प्रवाशांना दिलासा; बंगळूर–दिल्लीसाठी विशेष गाड्यांची घोषणा गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न

Pune : पुण्यासह देशभरातील विविध विमानतळांवर 'इंडिगो' मुळे अभूतपूर्व गोंधळ उडाला. अचानक मोठ्या प्रमाणात विमाने रद्द झाली, तर काही विमान कंपन्यांनी वाढविलेले तिकीटदर यातून विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांची सुटका होण्यासाठी रेल्वे प्रशासन पुढे सरसावले आहे.

रेल्वे मंत्रालयाने देशातील प्रमुख स्थानकावरून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुण्याहून बंगळूर आणि दिल्लीसाठी विशेष रेल्वेचा समावेश आहे. पुणे-बंगळूर-पुणेदरम्यान प्रत्येकी एक फेरी होणार आहे.

Pune : पुण्यात मोठी दुर्घटना! एमआयडीसीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू; परिसरात हळहळ

गाडी क्रमांक-०६२६३ केएसआर बंगळूर-पुणे विशेष रेल्वे रविवारी (ता. ७) सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी बंगळूर येथून निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून ३० मिनिटांनी ही रेल्वे पुण्यात दाखल होईल. गाडी क्रमांक-०६२६४ पुणे-बंगळूर विशेष रेल्वे सोमवारी (ता. ८) दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी पुण्यातून सुटेल, दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी बंगळूर येथे पोहचेल.

या गाडीला दौंड, कुर्दुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, शहाबाद, वाडी, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अडोनी, गुंटकल, अनंतपूर, धर्मावरम, हिंदुपूर आणि येलहंका आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

पुणे-दिल्ली-पुणे विशेष रेल्वे

गाडी क्रमांक - ०१४०९ ही रेल्वे पुण्याहून रविवारी (ता. ७) रात्री ८ वाजून २० मिनिटांनी निघेल. दुसऱ्या दिवशीच्या रात्री मंगळवारी (ता. ९) एक वाजता दिल्ली (हजरत निझामुद्दीन) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक - ०१४१० ही रेल्वे दिल्ली (हजरत निझामुद्दीन) येथून मंगळवारी (ता. ९) पहाटे ५ वाजता सुटेल. पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, ग्वालियर आणि आग्रा कॅन्ट आदी स्थानकावर थांबा देण्यात आला.

'इंडिगो'ने विमाने अचानक रद्द केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अशा प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पुण्याहून दिल्ली आणि बंगळूरसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे.

- पीयूष संगापूरकर, रेल्वे अभ्यासक, पुणे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *