Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Pune Shocking : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट असतानाच पुण्यात आणखी एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. पुण्यातील धनकवडीमध्ये ३५ वर्षीय महिलेने सासरच्या छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांत ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

पुण्यातील धनकवडीमध्ये छळाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली. वर्षा तुकाराम रणदिवे (३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नणंद यांच्यासह चौघांवर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुकाराम रणदिवे यांनी पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी उज्वला बागाव (५३), योगेश बागाव (३५), वैशाली बागाव (३२), सुवर्णा बागाव (२५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Thane Water : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, बुधवारी शहरात पाणी कपात

बागाव आणि रणदिवे कुटुंबीय एकमेकांचे शेजारी आहेत. उज्वला तिचा मुलगा योगेश, मुलगी वैशाली आणि सुवर्णा या अनेक दिवसांपासून वर्षा यांना टोमणे मारून त्यांचा छळ करत होत्या. हा छळ असह्य झाल्याने वर्षा यांनी गळफास घेऊन २४ मे रोजी आत्महत्या केली. आकस्मित मृत्यूची नोंद केल्यानंतर याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती.

पोलिसांनी याबाबत तपास केला असता आरोपींच्या छळाला कंटाळून वर्षा यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास सहकारनगर पोलिसांकडून सुरू आहे. वर्षाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळीवर कडक कारवाईची मागणी केली आहे. वर्षाच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply