Pune Rain Update : मान्सूनचा एन्ट्रीलाच धडाका, बदाबदा कोसळणाऱ्या पावसाने पुणेकरांना धडकी, 34 वर्षाचा रेकॉर्ड मोडला

Pune Rain Update : पुणे शहरासह जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या 34 वर्षांतील सर्व विक्रम मोडले. पुण्यात दोन दिवसापासून पावसाने पुण्याला झोडपले आहे.   संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मागील नऊ दिवसांत 209 मिमीपावसाची नोंद झाली आहे.  या पूर्वी जून 2019 मध्ये 74 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.  तर 8 जून 2024 लोहगावात 139.8 तर शिवाजीनगरात 117 मि.मी. पावसाची नोंद झाली.  जिल्ह्यात इंदापूरमध्ये 110 मि.मी. पावसाची नोंद झाली. 

संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय.  पहिल्यास पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं.   पहिल्याच पावसात पुणे पूर्णपणे तुंबले होते. यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.  मागच्या वर्षी शहरासह जिल्ह्यात नियोजित वेळेपेक्षा तब्बल 10 ते 15 दिवस उशीरा आला होता. दरवर्षी शहरात तो 9 ते 10 जून दरम्यान येतो. मागच्या वर्षी 25  जून रोजी शहरात दाखल झाला होता.  

पुण्याला आज ऑरेंज अलर्ट

पुण्याला आज ऑरेंज अलर्ट  देण्यात आला आहे. आजही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची (Maharashtra Rain)  हजेरी लावली आहे.  पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे.   



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply