Pune Rain : पुण्याला पावसाचा दणका! राज्यात पुन्हा बरसणार अवकाळीचा तडाखा; 'या' जिल्ह्यांत पावसासह गारपीटीचा इशारा

Pune Rain : राज्यात हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.

राज्यातील काही भागांतील वातावरणात मोठा बदल झाला आहे.दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर पहाटेच्या सुमारास शहरातील काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. हडपसर, लोणी काळभोर तसेच पुणे ग्रामीण परिसरात पावसाने हजेरी लावली.

Pune Pubs News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! सर्व पब्स आणि रेस्टॉरंट रात्री १.३० वाजता बंद होणार

मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल,तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होईल. दरम्यान, पुणे शहरात दुपारनंतर अजून हलका पाऊस,तर काही भागांत गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply