Rain Update : पुणे परिसरात आज पावसाचा इशारा

Pune Rain - पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणाचे सावट कायम राहण्याची चिन्हे सध्या आहेत, तर मंगळवारी (ता. ६) पुणे व परिसरात मेघगर्जना, जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

सोमवारी (ता. ५) शहरात ३४.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर पुण्यातील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मगरपट्टा आणि कोरेगाव पार्क येथे १.५ मिलिमीटर आणि १ मिलिमीटर इतका पाऊस झाला, तर जिल्ह्यातील काही भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदला गेला. रविवारी (ता. ४) पुण्यात झालेल्या जोरदार पावसानंतर मात्र सोमवारी ढगाळ वातावरणाचे सावट अधूनमधून पाहायला मिळत होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *