Pune Rain : मुसळधार पावसाने पुणेकरांचे हाल! टपरी हलवताना करंट लागून तिघांचा मृत्यू; ताम्हिणी घाटात दरड कोसळून १ ठार

Pune Rain : पुणे शहरामध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली असून झाड कोसळल्याच्या अनेक दुर्घटना समोर येत आहेत. शहरातील डेक्कन जिमखाना परिसरात तीन युवकांचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तसेच ताम्हिणी घाट आणि भिमाशंकर मार्गावर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

पुण्यात पावसाचा हाहाकार

पुणे शहरामध्ये काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शहरातील डेक्कन जिमखाना परिसरात विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune Rain : पुणेकरांसाठी धोक्याची घंटा, येत्या २४ तासांत अतिमुसळधार पाऊस कोसळणार; रेड अलर्ट जारी

विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

जिमखाना येथील नदी पात्रात पुलाची वाडीतील ३ युवकांचा टपरी शिफ्ट करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. अभिषेक अजय घाणेकर (वय 25), आकाश विनायक माने (वय 21), शिवा जिदबहादुर परिहार (वय १८) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शहरामध्ये पावसाची धार सुरूच असून खडकवासला धरणातून विसर्ग केल्यानंतर बाबा भिडे पूल बंद करण्यात आला आहे. तसेच नारायण पेठ रस्त्यापर्यंत पाणी आल्याने रस्ते बंद केलेत.

ताम्हिणी घाटात दरड कोसळली, घाट बंद!

ताम्हिणी घाटाजवळील आदरवाडी येथे रस्त्याकडेच्या पिकनिक पॉईट हॉटेलवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये हॉटेलमधील दोघ जण मलब्या खाली दबले गेले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रायगड मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. घाट साधारण ४-५ तास बंद राहिल असा अंदाज आहे.

भिमाशंकरला जाणारी वाहतुक बंद!

भिमाशंकर राजगुरुनगर मार्गावर मोरोशी शिरगाव फाट्यावर दरड कोसळल्याची दुदैवी घटना घडली असुन बाजुलाचा असणारा जनावरांचा गोठा थोडक्यात बचावला असुन प्रशासनाकडून दरड काढण्याचे काम चालु असुन राजगुरुनगर मार्गे भिमाशंकरला जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply