Pune : भाजपने पुण्यात समुद्रही आणून दाखवला, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सणसणीत टोला

Pune : रात्रीपासून कोसळणाऱ्या पवासमुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असून मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र या पावसामुळे पुणेकर मात्र हैराण झाले असून सतत कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी पुण्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच विविध भागांतही पाणी साचले असून काही दुकानांतील सामानाचेही नुकसान झालं आहे. पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याचे वृत्त असून याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एक ट्विट करत सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. ‘ पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!’ अशा शब्दांत खोचक टीका करत जयंत पाटील यांनी टीकास्त्र डागले आहे.

Mumbai : ब्रेकिंग! पहिल्याच पावसात मुंबई- अहमदाबाद महामार्ग खचला, वाहने अडकली; वाहतुकीचा मोठा खोळंबा

X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल नेटवर्किंग साईटवर जयंत पाटील यांनी त्यांच्या अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. पावसामुळे पुण्यात साचलेलं पाणी, पुणेकरांचे झालेले हाल याचा दाखल देत त्यांनी सत्ताधाऱ्यावर टीका केली आहे. त्यांचं ट्विट जसच्या तसं, त्यांच्याच शब्दांत…

काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!

पुण्यात विविध भागांत साचलं पाणी

पुण्यात शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरात विविध भागात पाणी साचले आहे. पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात अजूनही पाणी साचलेले आहे. भुयारी मार्गात असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे दुकानातील सामानाचे नुकसान झाले. दुकानातील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला.

पुण्यात शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर ओटा याठिकाणी झाड पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आज पहाटेपर्यंत शहराच्या विविध भागातील झापटपट्टीत एकूण 55 ठिकाणी पाणी शिरले आहे. तसेच 22 आणि भिंत पडल्या. पुण्यात एकूण 79 घटनांची नोंद झाली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री लोहगाव, कलवड वस्ती येथून पाण्यात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरुप रित्या सुटका केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply