Pune : पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुमारे दीड हजार नागरिकांचे स्थलांतर

Pune :  खडकवासला व पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने रविवारी मुळा मोठा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या सोसायट्या, वस्त्यामध्ये रविवारी सकाळपासूनच पाणी शिरण्यासाठी सुरुवात झाली. दरम्यान, महापालिका प्रशासनाने खबरदारी घेत नागरिकांना पुराचे पाणी येणार असल्याची पूर्व सूचना दिली होती. तसेच ठीकठिकाणी महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय, अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान, पीएमआरडीए पुराचे पाणी शिरणाऱ्या भागात हजर होते. महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शनिवारी मध्यरात्रीपासूनच पूरस्थिती वरती लक्ष ठेवून होते. याबरोबरच पूरबाधित नागरिकांना मदत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते.

Akola Accident : अकोल्यात डिझेल टँकर पलटी; डिझेल भरण्यासाठी लोकांची गर्दी

महापालिका प्रशासनाने एकता नगर, ताडीवाला रोड, मुळा रोड, शांतीनगर झोपडपट्टी, इंदिरानगर झोपडपट्टी, चिमा गार्डन, यशवंत नगरी कळस, साईनाथ नगर वडगाव शेरी, पुलाचीवाडी, पाटील इस्टेट झोपडपट्टी, रजपूत झोपडपट्टी, तपोधाम इंदिरा नगर वसाहत, नारायण पेठ, अमृतेश्वर घाट, मंगळवार पेठ, श्रमिक नगर दत्तवाडी, बोपोडी, बालेवाडी गाव अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या नागरिकाना दुपारीच बाहेर काढले. पीएमपी बस द्वारे नागरिकांना जवळच्या महापालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरते निवासासाठी ठेवले. तेथे नागरिकांची जेवण नाश्त्याची व्यवस्था ही केली. महापालिकेने एकूण 387 कुटुंबातील सुमारे दीड हजार नागरिकांना जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित केले. अशी माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापन निवारण कक्षाचे अधिकारी गुणेश सोनुने यांनी दिली.

पीएमआरडीए कडून २२५ कुटुंबाचे स्थलांतर महापालिका प्रशासनाप्रमाणेच

पीएमआरडीएच्या पथकाने ही नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवून त्यांचे प्राण वाचवले. पीएमआरडीएच्या पथकाने विश्रांतवाडी शांतीनगर याबरोबरच एकता नगर मधील नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवले रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सव्वा दोनशे कुटुंबांची नजीकच्या शाळा समाज मंदिर येथे तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली. तसेच नागरिकांना जेवण, नाश्ता ही पुरविला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply