
Pune Rain : पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावाला पूराच्या पाण्याने वेढा घातला आहे, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे, शेतात पाणी साचले, घरांना- इमारतींना तडे गेले आहेत. पुणे जिल्ह्यातला पाऊस लक्षात घेता एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. पूरात अडकलेल्या गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नेमका कुठे जाता याची माहिती समोर आली आहे. हवामान खात्याने आकडेवारी जारी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पनदरेमध्ये झाली आहे. पनदरे मध्ये १०४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ दौंड तालुक्यात ९८ मिलिमीटर इतका पाऊस झाला. दौंड नंतर लोणावळ्यात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अजूनही या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाला बारामती आणि इंदापूरमधील पावसाचा अहवाल सादर केला. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झालेल्या पावसाची आकडेवारी अहवालातून सादर करण्यात आली. बारामती आणि इंदापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात ८३.६ मिमी पाऊस तर इंदापूर मध्ये ३५.७ मिमी पाऊस झाला.
पुणे जिल्ह्यात कुठे किती पावसाची नोंद -
पनदरे: १०४ मिमी
दौंड: ९८ मिमी
लोणावळा: ७६ मिमी
बारामती: ४९.५ मिमी
ढमढेरे: ३५.५ मिमी
वडगाव शेरी: ३४ मिमी
निमगिरी: २८ मिमी
माळीण: २७ मिमी
हडपसर: २५ मिमी
बारामतीमधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी -
बारामती: ७७ मिमी
माळेगाव: ८२.८ मिमी
पनदरे: १०४.८ मिमी
वडगाव: ९६.३ मिमी
लोणी: ८६ मिमी
सुपा: ७६ मिमी
मोरगाव: ७५.५
उडवडी: ८५.३
शिर्सुफळ: ७४.३
इंदापूरमधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी -
भिगवण: ६३.३ मिमी
इंदापूर: २३.५ मिमी
लोणी भापकर: ४८.३ मिमी
बावडा: २३ मिमी
काटी: २६.५ मिमी
निमगाव केतकी: १८ मिमी
अंथुरने: ४४ मिमी
पळसदेव: ४८.३ मिमी
लाखेवाडी: २६.५ मिमी
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

