Pune Rain : पुण्यात धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ, 'मविआ'च्या सभा रद्द

Pune Rain :  पुण्यातील अनेक भागात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागात पूर्वमौसमी पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. दरम्यान, पावसामुळे पुण्यातील उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुण्यात आज लोकसभा निवडणुकीच्या  अनुषंगाने अनेक राजकीय पक्षांनी सभांचे आयोजन केले होते, या सभांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे या सभा होतील का? असा प्रश्न निर्माण झालाय. 

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर विश्रांती घेणाऱ्या कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटलं; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण  

पुण्यात आज (दि.10) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर गेल्या तासाभरापासून पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे स्वारगेट परिसरातील रस्त्यांवर पाणी वाहू लागले आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून लोकांना उकाडा जाणवत होता. ऊनामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते. मात्र, आजच्या पावसामुळे पुण्यातील वातावरणात गारवा निर्माण झालाय. पुण्यातील लोक पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र, राजकीय पक्षांना याचा फटका बसलाय. कोंढवा परिसरात अजित पवारांची सभा होणार आहे. मात्र,पावसामुळे सभा पार पडणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply