Pune Rain: पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पुढचे २-३ तास माध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

पुणे: दिवसभराच्या विश्रांतीनंतर पुण्यात विजेच्या कडकडटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आज दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाला रात्री ९ वाजता अचानक सुरूवात झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान शहरातील सिंहगड रस्ता परिसरात अति मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील २ ते ३ तास माध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

फुरसुंगी,उरुळी देवाची आणि परिसराला वाऱ्यासह विजेच्या कडकडाट आणि जोरदार पावसाने झोडपले. दिडतास जोरदार पाऊस चालू असून वाऱ्याचा जोर एवढा जास्त आहे की पार्क इंफिनिया सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावरील प्लॅट मध्ये पाणी वाऱ्याने आतमध्ये आल्याचा प्रकार घडला.

तसेच नगर रस्ता परिसरात आता पावसाचा जोर वाढला आहे. पावणेदहा वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आहे. स्वारगेट, महर्षी नगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी परिसरात मुसळधार पाऊस गेल्या एक तासापासून सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply