Pune Rain : पुण्यात आजही पाऊस! खराडी, मुंढवा, रामटेकडी भागात मुसळधार, विद्युत पुरवठा खंडीत

पुणेः मागच्या काही दिवसांपासून पुण्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. कालही पाऊस आला होता. आजदेखील पुण्यावर काळेकुट्ट ढग जमा झाले आहेत.

पुण्यातील रामटेकडी भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असल्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलाय. यासह पाषाण, बाणेर भागात पावसाचं वातावरण झालेलं आहे.

पुण्यातील इतर भागातही ढगाळ वातावरण झालेलं आहे. शहरामध्ये थोडाही पाऊस झाला तरी वाहतुकीची समस्या निर्माण होते. प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावं लागतं. त्यामुळे सर्वांनाच पावसाची चिंता असते.

सध्या बरसत असलेला पाऊस अवकाळी असल्याने शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाच हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

मुंढवा, केशवनगर, खराडी परिसरामध्ये ढगांच्या गडगडात पावसाला सुरुवात झाली आहे. नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी पत्र्यातून आत येत आहे. मुसळधार पावसातही घरावर चढून पत्रे उडून तर जाणार नाही ना, या काळजीपोटी रहिवासी घराचे छप्पर दुरुस्त करत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply