Pune Pubs News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! सर्व पब्स आणि रेस्टॉरंट रात्री १.३० वाजता बंद होणार

Pune Pubs News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुणे शहरात आता सर्व पब्स आणि रेस्टॉरंट रात्री 1.30 वाजताच बंद होणार आहेत. पब्स आणि रेस्टॉरंटमधीस ग्राहकांना १५-२० मिनिटे बफर टाइम देऊन सर्व अस्थापना बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. 

शहरात आता सर्व पब्स आणि रेस्टॉरंट रात्री बंद करण्याच्या वेळेबाबत पोलीस आयुक्तांनी महत्वाची आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तालयात आज हॉटेल आणि पब चालकांची महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत काही प्रस्ताव घेऊन आलेल्या पब मालक आणि चालकांना आयुक्तांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात सूचना दिल्या.

Pune News : दोन महिने उत्पादन शुल्क विभागाची धडाधड छापेमारी; अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील अनेक नामांकित पब आणि रेस्टॉरंटचे मालक यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. आता पबमध्ये हुक्काचे सेवन आणि विक्री करण्यास सक्त मनाई असणार आहे. तर रात्री १.३० पर्यंत पबमधील 'डिस्को थेक' सुरू राहणार आहे. तसेच परदेशातील कोणी कलाकार सादरीकरणासाठी येणार असतील तर त्यांच्या संदर्भात माहिती पोलिसांना देणे अनिवार्य राहणार आहे.

पुण्यातील अनेक नामांकित पब आणि रेस्टॉरंटचे मालक यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. आता पबमध्ये हुक्काचे सेवन आणि विक्री करण्यास सक्त मनाई असणार आहे. तर रात्री १.३० पर्यंत पबमधील 'डिस्को थेक' सुरू राहणार आहे. परदेशातील कोणी कलाकार सादरीकरणासाठी येणार असतील तर त्यांच्या संदर्भात माहिती पोलिसांना देणे अनिवार्य राहणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुणे पोलिसांकडून 'परमिट रुम'विषयी आदेश जारी करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर रात्री दीडपर्यंत पब्स आणि रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बार, परमिट रुम आणि रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरु राहिल्यास आजूबाजूची शांतता भंग होण्याची शक्यता असते, या कारणात्सव सीआरपीसी कलमांतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply