Pune Porsche Case : विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालचा पाय आणखी खोलात; पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Pune Porsche Case :  पुणे हिट अँड प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील व्यवासायिक विशाल अग्रवाल, वडील सुरेंद्र अग्रवाल यांच्या अडचणी भर पडली आहे. या दोघांनी कोंढवा भागातील जमिनीच्या व्यवहारातील एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोघांनी जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी अग्रवाल पिता-पुत्राविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत अग्रवाल पिता-पुत्राविरुद्ध पाचवा गुन्हा नोंद झाल्याचे समोर आले आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यात मुश्ताक शब्बीर मोमीन यांनी अग्रवाल पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र ब्रह्मदत्त अग्रवाल, विशाल अग्रवाल, जसप्रीतसिंग राजपाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Kalyan Crime : प्रवचनाला येणाऱ्या महिलेवर पडली वाईट नजर; लग्नाचे आमिष दाखवून केलं भयकंर कृत्य, कल्याणमध्ये खळबळ

पोलिसांनी अग्रवाल पिता-पुत्राविरोधात फसवणुकीचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुणे हिट अँड रन प्रकरणात गोत्यात आलेल्या अग्रवाल पिता-पुत्राविरोधात आणखी एका गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शब्बीर मोमीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिता आणि पुत्र विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या पिता-पुत्रांनी जमिनीच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे. या तक्रारीनंतरएक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, पुणे हिट अँड रन अपघात प्रकरणी अल्पवयीन तरुणाच्या ८-१० मित्रांची चौकशी पोलिसांनी केली. अल्पवयीन तरुणासोबत पार्टीमध्ये असलेल्या मित्रांची चौकशी करण्यात आली आहे. कोझी आणि ब्लॅक पबमध्ये पार्टी केलेल्या सगळ्या मित्रांचे पोलिसांनी जबाब नोंदवले आहे. पार्टीत नेमकं काय झालं? पार्टी कोणी ठेवली होती? कोण कोण याठिकाणी, असे अनेक प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply