Pune Porsche Car Accident : पोर्शेमध्ये तांत्रिक बिघाड ते मुलाकडे गाडी देण्याची सूचना; विशाल अग्रवाल यांच्या ड्रायव्हरने जबाबात दिली माहिती

Pune : मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना विशाल अग्ररवाल यांनी दिली असल्याचे चालकाने त्याच्या जबाब सांगितले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भरधाव वेगात महागडी कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आरोपीने ज्या पबमध्ये मद्यपान केले त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना बुधवारी (ता. २२) सत्र न्यायाधीश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Pune Dagdusheth Ganpati : वैशाख पौर्णिमेनिमित्त 'दगडूशेठच्या बाप्पाला' ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य!

आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक असलेले विशाल सुरेंद्रकुमार अग्ररवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एन आय बी एम) आणि जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी चालवत असलेल्या पोर्शे कारमधील चालकाचा जबाब नोंदवला आहे. या जबाबत चालकाने नमूद केले आहे की, आरोपीचे वडील विशाल अग्ररवाल यांनी त्याला सूचना केली होती की, मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस. या सूचनेनुसार त्याने मुलाला गाडी चालवायला दिली होती, असे जबाब नमूद आहे.

अल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल व क्लबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, त्या हॉटेल व क्लबमध्ये दारू मिळते याची माहीती अग्ररवाल यांना होती. तरी देखील त्यांनी त्याला पार्टीला जाऊ दिले. पार्टीसाठी जाताना त्याला पॉकेटमनी दिला होता का? पार्टीसाठी अल्पवयीन मुलाला नेमके किती पैसे दिले होते किंवा स्वतःचे क्रेडीटकार्ड वगैरे दिले होते काय? अल्पवयीन मुलासोबत पार्टीसाठी कोणकोण होते? या बाबत आरोपीकडे सखोल तपास करून पुरावे हस्तगत करायचे आहेत. त्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला.

गावकर आणि शेवानी यांनी आरोपी अल्पवयीन आहे की नाही, याची तपासणी न करता त्यांना मद्यपान करण्याची परवानगी दिली, असे ऍड. विभुते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींच्यायावतीने ऍड. सुधीर शहा, ऍड. अमोल डांगे आणि ऍड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने तीनही आरोपींना २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तिघांनाही येरवडा पोलिस ठाण्यातील कोठडी ठेवण्यात येणार आहे.

अपघातग्रस्त मोटार ही बंगळूरमधून खरेदी करण्यात आली होती. या मोटारीत तांत्रिक बिघाड असल्याचे अग्रवाल यांच्या निदर्शनास आले होते. गाडीतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून देण्याबाबत त्यांनी कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधला होता. मात्र कंपनीने त्याची दखल न घेतल्याने याबाबत अग्ररवाल यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. तेथे दाखल असलेली तक्रार अद्याप प्रलंबित आहे.

त्यामुळे गाडीची अद्याप नोंदणी करण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. मात्र त्यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. गाडीत तांत्रिक बिघाड आहे होता तर ती गाडी मुलाला चालवण्यासाठी का दिला? असा सवाल उपस्थित करत गाडीबाबतची पूर्वकल्पना असताना देखील त्याला ती चालवयला देणे गंभीर आहे, असे ऍड. विभुते यांनी न्यायालयात सांगितले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply