Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी तरणाला RTO कडून धडे

Pune : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी तरुणाला आरटीओने धडे दिले आहेत. या तरुणाला रोड सेफ्टी प्रोगाम ट्रेनिंग देण्यात आली. त्याला वाहतुकीचे नियम, वाहन कसे चालवावे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होते यासर्व गोष्टी त्याला सांगण्यात आल्या. याप्रकरणातील आरोपी तरुण सध्या जामीनावर बाहेर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी तरुणाला आरटीओने शनिवारी धडे दिले. अल्पवयीन तरुणाला रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग देण्यात आली. वाहतुकीची नियमावली, वाहन चालवताना घ्यायची काळजी, आरटीओकडून कशी कारवाई केली जाते या सारख्या अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. अल्पवयीन तरुणाला धडे देताना प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली.

Pune : आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको; फक्त सातबारा कोरा करा, महिलांची अजित पवारांकडे मागणी

अल्पवयीन तरुणाला शिक्षा म्हणून ३०० शब्दांचा निबंध लिहण्यासोबत तसेच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत काम करण्याच्या अटी शर्तीवर जामीन दिला होता. त्यानुसार वाहतूक शाखेकडून त्याला आता आरटीओचे धडे देण्यात आले. दरम्यान, पोर्शे कार अपघातातील तरुण अल्पवयीन असल्यामुळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आले होते. पण हायकोर्टाच्या आदेशानंतर ३३ दिवसांनंतर आरोपी तरुणाची बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली होती.

दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी भरधाव पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना चिरडले होते. पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा ही पोर्श कार चालवत होता. या अपघातामध्ये इंजिनिअर अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कारचालक तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. पण तो अल्पवयीन असल्यामुळे बाल न्याय मंडळाने त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहून, १५ दिवस वाहतूक नियमन करण्यास सांगत जामीन मंजूर केला होता. पण नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात टाकले होते. पण जामीनानंतर या मुलाला पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचे सांगत हायकोर्टाने या मुलाची बालसुधारगृहातून तात्काळ सुटका करण्यात यावी असे निर्देश दिले होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply