Pune Porsche Car Accident : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण, शिवानी आणि विशाल अग्रवालच्या पोलिस कोठडीत ५ दिवसांची वाढ

Pune : पुणे पोर्शे कार अपघातातील  आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना आज पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना कोर्टाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

पुणे अपघात प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोघांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावणी. आजच्या सुनावणीदरम्यान चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'साक्षीदार, एफ एस एल यांच्या तपासातून निष्पन्न झालं की विधी संघर्षात बालकाच्या ऐवजी आईचे रक्त वापरण्यात आले. या सगळ्या षडयंत्रामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपींचे म्हणजे विशाल अग्रवाल आण शिवानी अग्रवाल यांच्या डीएनए सँपल घ्यायचे आहेत. ३ लाख रुपये कोणाकडून घेतले आहेत याचा तपास करायचा आहे. मूळ रक्त नमुने आणि त्यातील सिरींज कोणाला दिली याचा शोध घ्यायचा आहे.

Lok Sabha Exit Poll Results : पश्चिम बंगालमध्ये ममतांना धक्का बसणार; एक्झिट पोलनुसार २०१९ पेक्षाही कमी जागा मिळण्याची शक्यता

या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाने युक्तीवाद केला की, 'विधी संघर्षित बालकाचे हे पालक आहेत. रक्त बदलण्याच्या प्रकरणात पालकांचा थेट समावेश आहे. शिवानी अग्रवालला कोणीतरी सांगितलं आहे की ससूनमध्ये जायला. रक्ताचे नमुने देण्यासाठी शिवानी यांना कोणी सांगितलं यासाठी तपास करायचा आहे. सखोल चौकशीसाठी ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी.'

तर आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले की, '१९ तारखेला अपघात झाल्यानंतर घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलिसांना सरेंडर केले आहे. तपास अधिकाऱ्यांना कधी ही गरज लागली तर आरोपी हजर राहतील म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी.' तसंच, चौकशी अधिकाऱ्याने असे सांगितले की, 'सीसीटीव्ही फुटेज जे मिळालं आहे त्यात छेडछाड झाली आहे. दोन्ही आरोपींची चौकशी करायची आहे.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply