Pune Porsche Car Accident : ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरण, ससूनमधील महत्वाची कागदपत्र पोलिसांकडून जप्त

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या  गन्हे शाखेने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. ससून रुग्णालयातील  रजिस्टर आणि आवश्यक कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायाविरोधात गुन्हे दाखल असून आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणात आतापर्यंत एकूण तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. या गुन्ह्यांमधील इंटरलिंक्स आणि समान दुवे शोधले जात आहेत. या तपासात गुन्ह्यासंबंधी कागदपत्र जुळवळे, त्याचे व्यवस्थित अभिलेख तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरात लवकर न्यायालयात आरोपपत्र दाखल होण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवा जुळवा सुरू आहे.

Pimpari Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सांगवी परिसरात खळबळ

याप्रकरणात पुणे पोलिसांनी सोमवारी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक केली. त्यानंतर याप्रकरणात पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी मदत करणाऱ्या शिपायी अतुल घटकांबळे याला देखील अटक केली. याप्रकरणात तिघांची देखील चौकशी सुरू असून नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अजय तावरे यांनी मी या प्रकरणात अनेकांची नावं घेणार असल्याचा इशारा दिला होता. याप्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांनी आज डॉ. श्रीहरी हळनोर यांना ससून रुग्णालयात आणले होते. कुठल्या ठिकाणी काय कार्य केले, भेट कुठे झाली? याबाबत पोलिसांनी श्रीहरी हळनोर यांना ससूनमध्ये आणून चौकशी केली.

तसंच, ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरणात अटक असलेल्या ससून रुग्णालयातील शिपायी अतुल घटकांबळे याला देखील पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयामध्ये आणले होते. त्याच्याकडून सर्व प्रकारची माहिती घेतली गेली. ⁠ब्लड सॅम्पल्स बदलल्यानंतर ते कुठे फेकलेस? ही सर्व माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आलेली आहे. त्यानंतर अतुल घटकांबळेला पोलिसांनी पुन्हा पोलिस आयुक्तालयामध्ये नेले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply