Pune Porsche Accident : पोर्शे अपघात प्रकरणी मोठा ट्विस्ट; ससून रुग्णालयातील कर्मचारी पळाला, पोलिसांचा शोध सुरू

Pune Porsche Accident : पुणे पोर्शे अपघातात प्रकरण रोज नवीन नवीन ट्विस्ट समोर येत आहे. आता ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी चौकशीच्या भीतीपोटी पळून गेल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधात असल्याची माहिती मिळत आहे. पोर्शे अपघातात प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टारांना निलंबित करण्यात आलंय, तर अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी देखील सुरू आहे.

आता ससून रुग्णालयातील हा कर्मचारी आपल्याला ताब्यात घेतील  या भीतीपीटी पळाल्याची माहिती मिळतेय. ⁠या कर्मचाऱ्याने डॅाक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोर यांना मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आज या कर्मचाऱ्याला पोलीस अटक करण्याची शक्यता होती. त्यामुळे हा कर्मचारी पळून गेला आहे.पुणे पोलीस या आरोग्य कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत. पोर्शे अपघातावरुन ससून हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Nashik Lok Sabha : निवडणूक कामकाजात बडतर्फ शिक्षकांची नेमणूक? निलंबित 48 शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

हा कर्मचारी ससून हॉस्पिटलच्यारक्त चाचणी विभागातील असल्याची माहिती मिळतेय. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रूग्णालयातील तिघांना ताब्यात आतापर्यंत घेण्यात आलं  आहे. याप्रकरणी अजूनही काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलीय. रुग्णालयातील डॉक्टरांनी आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला गेला आहे.

ससून हॉस्पिटलमध्ये पुणे पोर्शे अपघातातातील आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यामध्ये टाकल्याचा आरोप दोन डॉक्टरवर करण्यात आला होता. यासाठी त्यांनी ३ लाख रूपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात आज रक्त चाचणी विभागामधील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. त्यानंतर अजूनही काही मोठे खुलासे होऊ शकतात, अशी शक्यता आहे.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply