Pune Porsche Accident : धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पलची अदलाबदल; ससूनमधील दोन डॉक्टरांना पोलिसांकडून अटक

Pune Porsche Accident : पुणे अपघातप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर, अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाने सुसाट कार चालवत दोघांना चिरडलं होतं. या अपघातात एका तरुणासह तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातावेळी अल्पवयीन मुलगा हा दारू पिऊन कार चालवत असल्याचा आरोप करण्यात आला.

Pune News : Pune SPPUबाहेर पडणं मुश्किल झालंय'; NSUIच्या अध्यक्षावर मुलीचा खळबळजनक आरोप, पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले. मात्र, हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली.

ही बाब उघड होताच पुणे पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली. सध्या पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरू आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेले डॉ. अजय तावरे हे ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे एचओडी आहेत. तर डॉ. श्रीहरी हरलोर हे रुग्णालयाचे सीएमओ आहेत. एका धनाढ्य व्यक्तीच्या पुत्राला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी दोन्ही डॉक्टरांनी कसे प्रयत्न केले, हे आता उघड झालं आहे. आता या डॉक्टरांवर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply