
Pune : कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्श कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल पन्नास साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरणासह आरोपींच्या मोबाइलचे विश्लेषण, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल आदी महत्त्वपूर्ण पुरावे या आरोपपत्रातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले आहेत.
आरोपपत्रात अनेक ठोस पुरावे
विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल आणि शिवानी अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांच्याविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात दाखल झालेल्या या आरोपपत्रात अनेक ठोस पुरावे नमूद आहेत.
|
|
गुरुवारी प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुढील काही दिवसात १७३ (८) प्रमाणे पुरवणी दोषारोपत्र दाखल करण्यात येईल. ‘डीएनए’ चाचणीसह इतर काही अहवाल येणे बाकी आहे. ते पुरवणी आरोपपत्र सोबत देण्यात येतील.- शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)
रक्तनमुन्यांत बदल; सात जणांवर आरोपपत्र
कल्याणीनगर भागात १८ मे च्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास अल्पवयीन ‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीला धडक दिल्याने तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. तत्पूर्वी, या मुलाने आपल्या मित्रांसोबत मुंढव्यातील दोन पबमध्ये पार्टी केली होती. त्यामुळे पोलिसांनी या मुलाला ससून रुग्णालयात नेले. तिथे त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यावेळी या मुलाला वाचविण्यासाठी आरोपींनी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा कट रचला. त्यासाठी विशाल अगरवाल याने अशफाक मकानदार याला एका हॉटेलमध्ये चार लाख रुपये दिले होते. मकानदार याने येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या परिसरात घटकांबळे याच्याकडे तीन लाख रुपये दिले. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर याच्या सांगण्यावरूनच घटकांबळेने हे पैसे स्वीकारले.
त्यापैकी अडीच लाख रुपये त्याने डॉ. हाळनोरला दिले आणि स्वतःकडे ५० हजार रुपये ठेवले होते, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांकडून हे तीन लाख रुपये जप्त केले आहेत; परंतु उर्वरित एक लाख रुपये कोणाला देण्यात आले हे अद्याप गुलदस्तात आहे. डॉ. हाळनोरने मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून त्याऐवजी शिवानीच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी पाठविला होता. प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालातून ही बाब उघड झाली. मकानदार रक्ताचे नमुने बदललेल्या ठिकाणासह ससून रुग्णालय, येरवडा पोलिस ठाणे आणि बाल न्याय मंडळ येथे हजर असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण आणि साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत आढळून आले.
आरोपपत्राशी संलग्न कागदपत्रे?
रक्त नमुने बहदलण्याचा सर्व घटनाक्रम, प्रत्यक्षदर्शींसह पन्नास साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरणाचे पंचनामे, तांत्रिक पुरावे, पोर्श कारचा क्रॅश इम्पॅक्ट अॅसेसमेंट अहवाल, न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

