Pune Politics : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

Pune Politics : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी महापौर तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक या वेळी उपस्थित होते.

कोथरूडमधील स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचा गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश झाला‌. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे.

त्यामुळे आज देशातील प्रत्येकाचा भाजपवर अढळ विश्वास आहे. या पक्षात गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य मिळते. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते आज मोदी यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत.

कोथरूडमधील आजच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल,’’ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. या वेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्चना पाटील, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, श्याम देशपांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply