Pune Politics : शरद पवार गटाचे पुणे शहरप्रमुख प्रशांत जगतापांसह ९ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Pune Politics : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून बदनामीकारक घोषणाबाजी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या डेंगळे पुलाजवळील कार्यालयाच्या ठिकाणी प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते. 

Indian Penal Code : देशात जुलैपासून 3 नवीन फौजदारी कायदे होणार लागू, ४२०, ३०२ रद्द; हे होणार मोठे बदल

त्यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयाच्या उद्‌घाटनावेळी लावलेल्या कोनशिलेवर अजित पवार यांचे नाव असल्याने संबंधित कोनशीलेची तोडफोड केली होती. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा लावण्या शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पक्षाच्या दोन गटांमध्ये भांडण लावणे, चिथावणीखोर व बदनामीकारक वक्तव्य करणे अशा कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत जगताप यांना धमकी

काही दिवसांपूर्वी प्रशांत जगताप यांनादेखील धमकीचा मेसेज आला होता. राजकीय टीका केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाचे मेसेज त्यांना अनोळखी फोन नंबरवरुन येत होते. याबाबत त्यांना पुणे पोलीस गु्न्हे शाखेकडे तक्रार केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply