Pune Police : दत्तवाडी पोलिस ठाणे आता पर्वती पोलिस ठाणे म्हणून ओळखले जाणार

Pune Police - शहरातील दत्तवाडी पोलिस ठाण्याचे नामकरण आता पर्वती पोलिस ठाणे असे करण्यात आले आहे. दत्तवाडी पोलिस चौकी आणि दत्तवाडी पोलिस ठाणे यांच्या नावातील साधर्म्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहर पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील दत्तवाडी पोलिस ठाणे हे स्वारगेट पोलिस ठाण्यापासून २००७ साली वेगळे झाले होते. दत्तवाडी पोलिस ठाणे आणि दत्तवाडी चौकी यामधील नामसाधर्म्यामुळे नागरिकांना संभ्रम होत होता.

याबाबत दत्तवाडी पोलिस ठाण्याचे नाव बदलण्याची मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांच्या अडचणींची दखल घेत पोलिस महासंचालक कार्यालयाने दत्तवाडी पोलिस ठाण्याचे नाव बदलून पर्वती पोलिस ठाणे करण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती. या परिसरातील पर्वती टेकडीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व विचारात घेवून नामकरण करण्याच्या निर्णय घेतला आहे, असे राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *