Pune News : उंड्रीत अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट; महापालिकेकडून मोठ्या इमारती जमीनदोस्त

Pune News: पुण्यातील उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं झाल्याचं समोर आलं आहे. उंड्री इथं महापालिकेनं या अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई केली आहे. बुधवारी इथल्या दोन मोठ्या इमारती पालिकेनं जमीनदोस्त केल्या.

यावेळी सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सुत्रांच्या माहितीनुसार, पुण्यात अनधिकृत रहिवासी इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे शहरातील उंड्री भागात पुणे महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

मेकॅनिकल माउंटेड जॉ कटर मशीननं या दोन रहिवासी इमारती पाडण्यात आल्या आहेत. वारंवार नोटीस देऊन सुद्धा इमारती रिकाम्या न केल्यामुळं आज महापालिकेनं जॉ क्रशर या अत्याधुनिक मशीननं बिल्डिंग जमीनदोस्त केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, उंड्री येथील सर्व्हे नं. ५१ आणि ५९ मधील अनधिकृत पाच मजली दोन इमारतींवर जॉ कटरच्या सहाय्यानं आज कारवाई करण्यात आली.

यामुळं सुमारे ३० हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडला. महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन-१च्यावतीनं ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोंढवा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply