Pune Ola- Uber News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ओला, उबेरच्या रिक्षांना पुणे शहरात ब्रेक; परिवहन प्राधिकरणाचा मोठा निर्णय

Pune  : पुण्यात रोपेन ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस (रॅपिडो) या कंपनीची मोबाइल अॅपद्वारे चालवण्यात येणारी बाईक टॅक्सी सेवा बंद करण्यात आल्यानंतर आता ओला, उबेरबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरात ॲपवर आधारित ओला, उबरला अधिकृत परवाना देण्यास पुणे परिवहन प्राधिकरणाने नकार दिला आहे. त्यामुळेच बाईक टॅक्सी प्रमाणेच ओला, उबेरच्या रिक्षांना पुण्यामध्ये सध्यातरी बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओला, उबेरने तीनचाकी टॅक्सीसाठी समुच्चयक परवाना मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. परंतु पुण्यातील ओला, उबेर रिक्षांचा परवाना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नाकारला आहे. प्रवासी अ‍ॅग्रिगेटरचा परवाना आरटीओने  नाकारल्यामुळे पुणेकरांना आता ओला, उबेरच्या रिक्षाने प्रवास करता येणार नाही.

मोटार वाहन कायद्याअंतर्गत अ‍ॅग्रिगेटसाठी ठरवून देण्यात आलेल्या नियमांनुसार आवश्यक त्या तरतुदींची पूर्तता न केल्याने पुणे परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे.दरम्यान, शहरांतर्गत चारचाकी टॅक्सी सेवा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाकडे सोपवला गेला आहे. तत्पुर्वी, रॅपिडोतर्फे पुण्यामध्ये मोबाइल अ‍ॅपद्वारे बाईक टॅक्सी सेवा सुरू होती. मात्र रॅपिडोकडे अ‍ॅग्रिगेटर लायसन्स नसल्याने पुण्यातील रिक्षा संघटनांनी याविरुद्ध आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) या बाईक टॅक्सी आणि रॅपिडो कंपनीवर कारवाई केली. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply