Pune Offices Closed : पुणेकरांसाठी मोठी बातमी ! पावसामुळे शाळांच्या पाठोपाठ ऑफिससुद्धा राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली सुट्टी

Pune : राज्यातील विविध भागासह पुण्याला पाऊस झोडपत आहे. अशात खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. आता पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आदेश दिले आहे. त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत

Bhide Bridge : भिडे पूल झाला बंद! खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

शहर आणि परिसरात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असून, यामुळे विविध भागांतील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

यासह मुठा नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सिंहगड रोड आणि कामगार पुतळ्यासह बऱ्याच भागात पाणी शिरल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

दुसरीकडे शहरातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरातही पाणीच पाणी झाले आहे. कारण मुठा नदीकाळी असलेल्या मंदीरवर खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे परिणाम झाला आहे.

या सर्व परिस्थितीनंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, "पुर्ण आणि परिसरात पाऊस सुरू आहे. यामुळे शहराचा बहुतांश भागात रस्त्यांवर पाणी साठले आहे. याखेरीज काही सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबाबत मी स्वत जिल्हाधिकारी, पुणे आणि जिल्हा प्रशासन यांच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. ज्या नागरीकांना मदतीची गरज आहे तिथ प्रशासकीय यंत्रणेसह आम्ही सर्वजण उपलब्ध आहोत. नागरीकांना देखील विनंती आहे की, अत्यंत महत्वाचे व गरजेचे असेल तरव घराबाहेर पडावे."



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply