Pune News : भवानी पेठेत 2015 पासून पाकिस्तानी तरुणाचे बेकायदेशीर वास्तव्य, पोलिसांनी घेतले ताब्यात, बनावट पारपत्र जप्त

Crime News: पुण्यामध्ये बेकायदेशीर रित्या पाकिस्तानी तरुण वास्तव्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोहम्मद अमान अन्सारी (वय 22) असे या तरुणाचे नाव असून भवानी पेठेतील चुडामन तालीम जवळ तो राहात होता अशी माहिती मिळाली आहे. खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद अमान अन्सारी हा पाकिस्तानी तरुण शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. या माहितीवरुन भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे भारतीय पारपत्र आढळून आले. अन्सारीने बनावट कागपत्रांद्वारे भारतीय पारपत्र मिळवले आहे

Follow us -

अन्सारीने बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, अन्सारीचा बेकायदा वास्तव्य करण्यामागचा हेतू काय होता, तसेच तो दहशतवादी कारवाईमध्ये सामील आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply