Pune News : पोहण्याचा नाद जीवावर बेतला! दम लागल्याने झाला अनर्थ; २५ वर्षाय तरुणाचा नीरा नदीत बुडून मृत्यू

Pune News : पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या मुंबईच्या  तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. या दुर्घटनेतील तरुणाचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला. ही दुर्देवी घटना ताजी असतानाच एका मुलाचा नीरा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, भोर तालुक्यातील शिंद येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा नीरा नदीच्या पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भोर तालुक्याच्या महूडे खोऱ्यातील शिंद येथील तरुण निशिकांत संभाजी मोहिते (वय-२५ ) हा सोमवारी (ता. २४) दुपारी १२ च्या सुमारास नीरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता.

यावेळी पोहता पोहता त्याला दम लागला, ज्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. या दुर्देवी घटनेत या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *