Pune news : ट्रॅव्हल्स कंपन्या जास्तीचं भाडं घेतायत? घाबरु नका, भांडत बसू नका, थेट 'या' मेल आयडीवर मेल करा!

Pune news : दिवाळीत खासगी बससेवा पुरवणारे प्रवाशांची लूट करत असतात. अवास्तव भाडं आकारत असतात. त्यामुळे आता जर खासगी बससेवा पुरवणाऱ्यांकडून जास्त भाडं आकारलं गेलं तर त्यांच्याविरोधात तक्रार करता येणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशाकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या mh14prosecution@gmail.com या ईमेल पत्त्यावर तक्रारी किंवा पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.  

खाजगी प्रवासी बसेसची सेवा पुरविणारे वाहतूकदारांनी संबंधित मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने वाहतूक सेवेकरीता आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या कमाल दीडपटपर्यंत भाडे आकारता येईल. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करणाऱ्या खासगी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आलेले आहेत. अधिक भाडे आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा आढळून आल्यास अशा वाहतूक पुरवठादारांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत खटला दाखल करण्यात येणार आहे,  अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे.

Ahmednagar Fraud Case : ॲक्टिंगचा नाद! गेले तेवीस लाख,चित्रपटात काम देण्याचे आमिष; कॅमेरामनला बेड्या

अवास्तव भाड्यासाठी कॉंग्रेस आक्रमक

खासगी बस वाहतूक, ट्रॅव्हल्सकडून सणाच्या काळात अवास्तव प्रवास भाडे आकारून होणारी आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात होती. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना बेकायदा भाडे आकारणी विरोधात कारवाई करावी,अशा मागणीचे निवेदन देण्यात आलं होतं. दिवाळी सणासाठी पुण्यातून बाहेरगावी खाजगी बस आणि ट्रॅव्हल्स कंपन्यामार्फत जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात विद्यार्थी आणि नोकरदार अधिक आहेत.  सणाच्या तोंडावर केलेली ही भरमसाठ भाडेवाढीने दिवाळीचा प्रवासाचा आनंद निघून जातो.तसेच खाजगी वाहनांना खाजगी बसेस आणि ट्रॅव्हल्सला भाडे निश्चिती मोटार ॲक्ट नुसार करण्यात आली असून ती एसटी भाड्यापेक्षा 50 टक्के अधिक आहे म्हणजेच जे एसटीचे भाडे 200 असेल तर तिकीट हे तीनशे रुपये खाजगी बस चालकांना घेता येते त्यामुळे वेळीच प्रशासनाने यात लक्ष घालावे आणि अकारण भाडेवाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी, असं कॉंग्रेस नेते  मोहन जोशी म्हणाले होते आणि आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे आता मेलकरुन आपली तक्रार देता येणार आहे. 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply