Pune : खळबळजनक घटना! विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने शिक्षकाने वर्गातच संपवले आयुष्य; दौंड तालुका हादरला

Pune : विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने शिक्षकाची तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दौंड तालुक्यातील जावजी बुवाचीवाडी हद्दीतील होलेवस्ती प्राथमिक शाळेतील घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, होलेवस्ती प्राथमिक शाळेतील दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी जवळच्याच दुसऱ्या बहुशिक्षकी शाळेत प्रवेश घेतला होता. या घटनेने निराश झालेल्या ४६ वर्षीय शिक्षकाने वर्गातच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अरविंद ज्ञानेश्वर देवकर (वय ४६, रा. निसर्ग सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली, मूळ - मावडी पिंपरी ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते दोन महिन्यांपूर्वीच जावजीबुवाचीवाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती येथील प्राथमिक शाळेत बदलून आले होते.

Buldhana Crime : खळबळजनक! जावयाचा पत्नी आणि सासूवर जीवघेणा हल्ला; मायलेकी गंभीर जखमी

अरविंद देवकर यांनी शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विषारी तणनाशक अंगात मोठ्या प्रमाणात भिनल्याने त्यांच्यावर सुरुवातीला उरुळी कांचन येथे उपचार करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर पाच दिवसांनी हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आत्महत्या केलेल्या शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहुन ठेवली होती. ज्यामधून या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला. माझ्याकडून समाजाचे नुकसान झाल्याने याच पवित्र मंदिरात मी माझ्या देहाचा त्याग करत आहे. याला सर्वस्वी मी जबाबदार आहे.. असे त्यांनी म्हणले आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने दौंड तालुका हादरुन गेला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply