Pune : आषाढी एकादशीला पुण्यातील सर्व कत्तलखाने बंद ठेवा : शिवसेनेची मागणी

Pune  : पुण्यातील सर्व कत्तलखाने आषाढी एकादशीला बंद ठेवा अशी मागणी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने पोलिस आयुक्त यांना करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन सेनेच्या पदाधिका-यांनी पाेलिस आयुक्तांना नुकतेच दिले आहे.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात समस्त वैष्णवांचा मेळा म्हणून मानल्या जाणाऱ्या आषाढी एकादशीच्या उत्सवानिमित्त पुणे शहरात शहरातील समस्त वारकरी संप्रदाय  व नागरिक आषाढी एकादशीच्या दिवशी उत्साहाने, भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होतात.

या दिवशी पुणे शहरात सुरू असलेले कत्तलखाने हे बंद करून समस्त वारकऱ्यांच्या भावनांना ठेच लागू नये. तसेच या दिवशी कोणत्याही पशु हत्या होवू नये याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व कत्तलखाने आषाढी एकादशीच्या दिवशी आपण बंद ठेवण्याचे आदेश यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शहर अध्यक्ष भानगिरे यांच्यासह सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे उपस्थित



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *